एक साधारण माणूस दिवसागणिक 4000 जाहिराती पाहतो. आपल्याला हे अती होत असेल तर जाहिरातविरोधक आपला खास मित्र आहे.
जाहिरातविरोधक हे एक छोटं सॉफ्टवेअर आहे जे जाहिराती अडविण्यासाठी वापरलं जातं, आणि ते दोन प्रकारे आपलं कार्य करतं. प्रथम मार्गाने ते जाहिरात देणाऱ्याच्या सर्वरच्या सिग्नलला अडवतं जेणेकरून जाहिरात आपल्या वेबपृष्ठावर कधी दिसतंच नाही. दुसऱ्या मार्गे जाहिरातविरोधक पृष्ठाच्या अशा भागांना अडवते जे जाहिराती असू शकतात.
या जाहिराती मोठ्या आवाजातील व्हिडिओ जाहिराती, आपल्या वेबवरुन येणार्या जाहिराती, ट्रॅकर्स, तृतीय-पक्षाच्या कुकीज आणि बरेच काही असू शकतात. जाहिरात ब्लॉकर वापरण्यासाठी, आपण आपल्या ब्राउझरमध्ये उपलब्ध असलेल्या ब्लॉगर अॅड-ऑन शोधू शकता. उदाहरणार्थ, Firefox कडे जाहिरात विरोधक अॅड-ऑनची ही मंजूर सूची आहे. या सूचीवर (किंवा आपल्या ब्राउझरसाठी मंजूर झालेल्या जाहिरात विरोधकावर) क्लिक करा आणि आपल्या गरजेनुसार निवडा.
एक सर्वोच्च जाहिरातविरोधक पण आहे जे सर्व जाहिरातींपासून मुक्त करते, पण ग्राहकांनो सावधान. आपली काही आवडती वर्तमानपत्रे आणि नियतकालिके जाहिरातींवर अवलंबून असतात. खूप लोकांनी जर त्यांच्या जाहिराती अडवल्या, तर त्यांचा व्यवसाय बंद पडू शकतो.
पॉपअप जाहिराती सर्वात वाईट असतात. त्यांना पॉपअप विरोधकासह अवरोधित करा आणि पुन्हा कधीही त्रास देणार्या पॉपअपच्या नादी लागू नका.
Chrome, Safari आणि Firefox साठी सर्वाधिक लोकप्रिय जाहिरात विरोधकांपैकी एक AdBlock आहे. याचा वापर Facebook, YouTube आणि Hulu वर जाहिराती अडवण्यासाठी करा.
Firefox वर आपण गोपनीयता किंवा मजकूर अवरोधन सेटिंग वापरून जाहिरात देणाऱ्या ट्रॅकरवर अजून नियंत्रण मिळवू शकता.
सुरु करण्यासाठी वरील बाजूस, उजव्या कोपऱ्यातील, Firefox मेनू वर क्लिक करा. हे बटन एकावर एक ठेवलेल्या तीन रेषांसारखे दिसते. खाली उघडलेल्या यादीमधून मजकूर अवरोधन निवडा. आपल्याला निळा पॉप-अप वेगवेगळ्या पर्यायांसह दिसेल.
जर जाहिरातींमुळे आपल्याला फरक पडत नाही आणि तृतीयपक्षीय कुकीज आणि ट्रॅकरने आपला पाठलाग केला तर चालणार असेल, तर मानक सेटिंग आपल्यास चालेल. मानक सेटिंग मध्ये ट्रॅकरना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी खाजगी ब्राऊझिंग वापरा.
अनेक जाहिराती पाहिल्यावर जर आपला दिवस खराब होत असेल, तर कठोर मोड उत्तम निवड आहे. हा मोड Firefox च्या सर्व विंडोमध्ये ज्ञात तृतीयपक्षीय कुकीज आणि ट्रॅकर अडवतो.
सानुकूल सेटिंग आपल्याला सर्वोत्तम पर्याय देते. ट्रॅकर,कुकीज आणि इतर काय अडवायचे हे आपण ठरवू शकता. जर एखाद्या संकेतस्थळावरून आपण कुकीजना परवानगी दिली तर आपण आपोआप सानुकूल मोड मध्ये जाता.
ट्रॅकर डब्या वर क्लीक करा आणि आपण दोन प्रकारे ट्रॅकर अडवू शकाल. खाजगी विंडो मध्ये काम करत असताना अडवणे हा एक प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे सर्व विंडो मध्ये ट्रॅकर अडवणे. लक्षात ठेवा, आपण जर नेहमीसाठी ट्रॅकर अडवायचे ठरवले तर काही पृष्ठे व्यवस्थित लोड होणार नाहीत.
आपण भेट दिलेल्या संकेतस्थळाकडून कुकीज पाठवल्या जातात. त्या तुमच्या संगणकात राहतात आणि साईट वर तुम्ही काय करताय हे पाहतात. जेव्हा एखादी विमान वाहतूक कंपनी तुम्ही त्या दिवशी आधी पाहिलेल्या तिकीटाची किंमत एक्दम वाढवते, तेव्हा ती कुकीजची हातचलाखी असते.
FIrefox मध्ये आपण सर्व तृतीयपक्षीय किंवा फक्त ट्रॅकरने बसवलेल्या कुकीज अडवू शकता. सर्व कुकीज अडवल्या तर काही साईट व्यवस्थित काम करत नाहीत हे लक्षात राहू द्या.
आपले ऑनलाईन वर्तन जाहिरातींसाठी वापरू द्यायचे नसेल तर आपण FIrefox मध्ये ट्रॅक करू नका हा पर्याय निवडून संकेतस्थळांना “धन्यवाद, पण नको” असे विनम्र पत्र पाठवू शकता. सहभाग ऐच्छिक आहे पण ज्या साईट सहभाग घेतात त्या आपल्याला ट्रॅक करणे त्वरित थांबवतात.
काही प्रकरणांमध्ये अॉड ब्लॉकर आपल्या ब्राउझर ला जलद चालण्यास मदत करेल. अॉड लोड होताना ती संकेतस्थळाला संथ करते. त्याच वेळी जर आपण इतर अॉड बंद करण्यात व्यस्त असाल तर आपल्याला हे हवे ते मिळण्यास उशीर होतो.
जर आपल्याला अॉड ब्लॉकिंग बद्दल अधिक जाणायचे असेल तर, Firefox आणि इतर ब्राउझर साठी शेकडो अॉड ब्लॉकर विस्तार उपलब्ध आहेत. जर FIrefox वापरतो तो अॉड ब्लॉकर वापरून पाहायचा असेल तर, इथे क्लिक करून गोपनीयतेला प्रथम ठेवणारा ब्राउझर डाउनलोड करा.