Firefox: अधिक संरक्षण. कमी चिंता.

आपल्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही वेडे आहोत. म्हणूनच आम्ही Firefox खाजगी ब्राउझिंग इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली बनविले आहे.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox गोपनीयता

कोणतीही निशाणी ठेवता ब्राउझ करा

शेअरिंग करणे चांगली गोष्ट आहे, परंतु तो निर्णय आपला असावा. Firefox खासगी ब्राउझिंग आपल्या संगणकावरून पासवर्ड, कुकीज आणि इतिहासासारख्या ऑनलाइन माहिती नष्ट करते. जेणेकरून जेव्हा तुम्ही बंद कराल, तेव्हा तुम्ही काहीच निशाण सोडणार नाही.

त्या लपलेल्या ट्रॅकर्सला पकडा

काही वेबसाइट्स आणि जाहिराती ट्रॅकर्स लपवतात, जे आपण सोडून गेल्यावरसुद्धा बराच वेळ आपली ब्राउझिंग माहिती एकत्रित करतात. फक्त Firefox खाजगी ब्राउझिंगमध्ये ट्रॅकिंग संरक्षण आहे जे आपोआप त्यांना अवरोधित करते.

मागोव्याचे वजन झटकून टाका

ट्रॅकर्स केवळ माहिती गोळा करत नाहीत, तर ते आपला ब्राउझिंग वेगही कमी करतात. केवळ Firefox खाजगी ब्राउझिंग छुपे ट्रॅकर्स असलेल्या जाहिरातींना अवरोधित करते, ज्यामुळे ट्रॅकर्सचे वजन सोडून आपण मुक्तपणे ब्राउझ करू शकता.