Mozilla जाहीरनामा परिशिष्ट

सुदृढ इंटरनेट साठी शपथ घ्या

मुक्त आणि वैश्विक इंटरनेट आजवरचं सर्वात शक्तिशाली संभाषण व सहयोग संसाधन आहे. याच्यात मानवी प्रगतीची अगाध आशा रुजलेली आहे. हे शिकण्याच्या, सामायिक मानवतेची जाणीव उभारण्याच्या आणि लोकांना सर्वत्र भासणाऱ्या समस्या सोडवण्याच्या नवीन संधी सक्रिय करते.

मागील दशकभरात अनेक प्रकारे हे वचन पूर्ण झालेले आम्ही पहिले आहे. विभिन्नता वाढवण्यास, अहिंसा भडकावण्यास, द्वेषाला प्रोत्साहन देण्यास आणि सत्य व वस्तुस्थिती जाणीवपूर्वक बदलण्यास इंटरनेटची शक्ती वापरलेलीही पहिली आहे. मानवाचा इंटरनेटचा अनुभव कसा असावा याचे ध्येय आपण सुस्पष्टपणे ठरवण्याची गरज आहे हे आम्ही समजले आहे. आता आम्ही तसे करतो.

 1. पृथ्वीतलावरील सर्वजणांना सामावून घेणाऱ्या इंटरनेटसाठी आम्ही वचनबद्ध आहोत — जिथे व्यक्तीचं जनसांख्यिक तत्त्व त्याची ऑनलाईन संचार, संधी आणि अनुभवाची गुणवत्ता ठरवत नाही.
 2. सामाजिक परिसंवाद, मानवी सन्मान, आणि वैयक्तिक भावप्रदर्शनाला पाठबळ देणाऱ्या इंटरनेटशी आम्ही वचनबद्ध आहोत.
 3. समीक्षणात्मक विचार, तर्कयुक्त मतभेद, सामायिक ज्ञान आणि पडताळण्यायोग्य सत्याला उभारी देणाऱ्या इंटरनेटशी आम्ही वचनबद्ध आहोत.
 4. विभिन्न समुदायांच्या सहकारातून सामायिक लाभ साधणाऱ्या इंटरनेटसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

आमचे 10 तत्त्वे

 1. तत्त्व 1

  आधुनिक जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्यघटक आहे — शिक्षण, संप्रेषण, सहकार, व्यवसाय आणि करमणुक यामधील एक महत्वाचा घटक.

 2. तत्त्व 2

  इंटरनेट हे एक वैश्विक सार्वजनिक संसाधन आहे जे सर्वांसाठी खुले आणि सहज उपलब्ध असले पाहिजे.

 3. तत्त्व 3

  इंटरनेटमुळे मानवाचे व्यक्तिगत आयुष्य सुधारले पाहिजे.

 4. तत्त्व 4

  इंटरनेट वरील व्यक्तीची सुरक्षा आणि गोपनीयता मूलभूत आहे पर्यायी नाही.

 5. तत्त्व 5

  व्यक्तींना इंटरनेट आणि त्यांच्या स्वतःचा अनुभव आकारणी क्षमता असणे आवश्यक आहे.

 6. तत्त्व 6

  सार्वजनिक संसाधन म्हणून इंटरनेटचा प्रभावी वापर यावर अवलंबून आहे परस्परकार्यकारिणी (इंटरफेस, प्रोटोकॉल, डेटा फॉर्मेट्स, कंटेंट), नवकल्पना आणि जगभरातील विकेंद्रित सहभाग.

 7. तत्त्व 7

  मुक्त आणि ओपन सोअर्स सॉफ्टवेअर इंटरनेटच्या विकासास सार्वजनिक संसाधन म्हणून प्रोत्साहन देते.

 8. तत्त्व 8

  पारदर्शक समुदाय आधारित प्रक्रिया सहभाग, जबाबदारी आणि विश्वास यांना प्रोत्साहन देते.

 9. तत्त्व 9

  इंटरनेटच्या विकासातील व्यावसायिक सहभागाने अनेक फायदे मिळतात; व्यावसायिक लाभ आणि सार्वजनिक लाभ यांच्यातील समतोल महत्वाचा आहे.

 10. तत्त्व 10

  इंटरनेटचा सार्वजनिक लाभ पैलू वाढवणे हे एक महत्वाचे ध्येय आहे, जो वेळ, लक्ष आणि प्रतिपुर्तीस पात्र आहे.