नवीन Firefox

Firefox Quantum ला भेटा.

उत्तमासाठी जलद.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox Privacy

नवीन काय आहे?

 • एक ताकदवान आणि नवीन इंजिन जे अतिजलद कार्यक्षमतेसाठी बनले आहे.
 • कमी मेमरी वापरणारे सुधारित आणि जलद पृष्ठ लोडींग.
 • बुद्धिवान ब्राऊझिंग साठी सुंदर रचना आणि हुशार सुविधा.

“वेगवान आणि आणखीनच मिनिमलिस्ट, Firefox Quantum समोर Chrome जुने दिसते.” — (डिजिटल ट्रेंड)

नवनिर्मित Firefox च्या नवीन टॅब पृष्ठाचा स्क्रीनशॉट.

2 गुणे जलद

अतिशय शक्तिशाली ब्राउझर इंजिन? आहे. पृष्ठ लोड होण्याकरिता कमी वेळ? हेसुद्धा आहे. आत्तापर्यंतचे सर्वाेत्तम Firefox मिळवा.

Chrome पेक्षा 30% हलका

कमी मेमरी वापर म्हणजेच आपला संगणक आता नेहमी सुरळीत चालेल. आपल्या इतर प्रणाली आपल्याला धन्यवाद देतील.

सुरळीत ब्राऊझिंग

Firefox च्या नवीन, प्रतिसादक्षम इंजिनमुळे आपण 10 किंवा 1000 टॅब्स जरी उघडले असले तरी एकावरून दुसऱ्या टॅब वर जाणे आधीपेक्षा खूप जलद झाले आहे.

अनेक उघडलेले टॅब व ब्राउझर पटल एकाच वेळी चालू असलेले दर्शवणारा Firefox चा स्क्रीनशॉट.

आपण ब्राउझर बदलत आहात? आम्ही आहोत ना.

आपली ऑनलाईन माहिती व आवडत्या गोष्टी इतर कोणत्याही ब्राउझर मधून क्षणार्धात आयात करा.

आणखी शिका

खरंखुरं खाजगी ब्राऊझिंग

अधिक मागोवा सुरक्षेसोबत सर्वात शक्तिशाली गोपनीय ब्राऊझिंग मोड.

 • खाजगी ब्राउझिंग

  आपण जेव्हा ब्राउझ करता तेव्हा Firefox ऑनलाईन मागोवा घेणारी यंत्रणा अडवून ठेवतो आणि आपले काम झाले की कोणताही इतिहास लक्षात ठेवत नाही.

 • मागोवा सुरक्षा

  काही जाहिरातींमध्ये लपलेले ट्रॅकर्स असतात, जे तुमचा ऑनलाइन पाठलाग करतात. हा असभ्यपणा आहे. हे आम्ही जाणतो. म्हणूनच आमचे शक्तिशाली साधन त्यांना जागीच थांबवते.

 • पूर्वीपेक्षा जलद पृष्ठ लोड होणे

  ब्राउझिंगचा वेग कमी करणाऱ्या काही जाहिराती आणि स्क्रिप्ट अवरोधित केल्याने पृष्ठे 44% अधिक जलद लोड होतात. आता ह्यात आपलाच फायदा आहे.

Firefox Quantum च्या सुविधा

Screenshots

स्क्रीनशॉट घेणे सोपे करा. थेट ते Firefox मधून घ्या आणि शेअर करा. याचा अर्थ आता आपल्याला संगणकावर रहस्यमयी फाईल नावांचा शोध घ्यावा लागणार नाही.

Pocket

साधनपट्टीत असलेले, हे नंतरसाठी जतन करण्याच्या अंतिम वैशिष्ट्यांमध्ये आहे. कोणत्याही डिव्हाइसवर आपले लेख, व्हिडिओ आणि पृष्ठे पहा.

खेळ आणि VR

पुढील-पिढीच्या गेमिंगसाठी बनविले गेलेल्या WASM आणि WebVR साठी Firefox चा अंतर्गत आधार आहे. कोणतीही अतिरिक्त स्थापना आवश्यक नाही!

लायब्ररी

वेळ वाचवा! Pocket सेव्ह, बुकमार्क, ब्राउझिंग इतिहास, स्क्रीनशॉट आणि डाउनलोड्ससारख्या सर्व पसंतीच्या सामुग्री एका जागी मिळवा.

सानुकूलन सुविधा

 • एक्सटेंशन्स्

  Firefox ला LastPass, uBlock Origin, Evernote सारख्या हजारो एक्सटेंशन्स् सह स्वेच्छेनुरूप करा.

 • योजना

  Firefox ला आपल्या मनासारखे बनवा! आमच्या थीम श्रेणीमधून एक नवीन स्वरूप निवडा किंवा आपली स्वत:ची थीम तयार करा.

 • साधनपट्‍टी

  आपल्या पद्धतीने Firefox स्थापित करा. सुखकर हाताळणी साठी साधनपट्टीवर साधने ओढून ठेवा.

तुमचा उपकरणाचा ताळमेळ करा

विनासायास पासवर्डस, वाचनखुणा आणि इतर गोष्टी हाताळा. आणि आमची टॅब पाठवा ही सुविधा वापरून डेस्कटॉप मोबाइल आणि टॅबलेट वर क्षणार्धात टॅब पाठवा.

टॅब पाठवा वैशिष्ट्य वापरून GIF ची प्रतिमा डेस्कटॉपवरून मोबाईलवर शेअर केली जाते.

चांगल्यासाठी ब्राउझ करा

Firefox is made by Mozilla, the non-profit champions of a healthy internet. Mozilla also tackles issues like privacy, misinformation and trolling by investing in fellowships, campaigns and new technologies designed to make the internet healthier.

नवीन Firefox

Firefox Quantum ला भेटा.

उत्तमासाठी जलद.