Firefox

ठिकाणाची-जाणीव (Location-Aware) सक्षम तपासणी (Browsing)

अधिक संलग्न व महत्वाची माहिती शोधण्याकरीता Firefox संकेतस्थळाला आपले ठिकाण कळविण्यास मदत करतो. यामुळे वेब अधिक हुशार बनतो – तेसच आपली देखिल पूर्णपणे गोपणीयता ठेवतो. वापरून पहा!

नेहमी विचारलेले प्रश्न

ठिकाणाची-जाणीव सक्षम तपासणी काय असते?

ठिकाणाची-जाणीव सक्षम संकेतस्थळ तुम्ही कुठे आहात ही माहिती गोळा करतो, व त्याचा वापर शोध मध्ये लागणारा वेळ कमी करणयास केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही जवळचे पिज्जा रेस्ट्रॉन्ट् करीता शोधत आहात. संकेतस्थळ तुम्हाल ठिकाण विचारेल, ज्यामुळे “पिज्जा” करीता केलेल्या शोधचा परिणाम तुम्हाला आढळेल... त्यानंतर अगाऊ माहिती किंवा टायपिंगची आवश्यकता नाही.

किंवा, कुठेही जात असल्यास फक्त दिशा प्रविष्ट केल्यावर, तुम्ही प्रवास कुठून सुरू करत आहात हे देखिल संकेतस्थळाला माहिती पडते, व त्याकरीता तुम्हाला फक्त लक्ष्य स्थळ निश्चित करावे लागेल.

ही सेवा संपूर्णपणे वैकल्पिक आहे – Firefox तुमची माहिती परवानगी शिवाय सहभागीय केली जात नाही – तसेच आपली गोपणीय माहिती गोपणीय राहवी याची खात्री केली जाते. ऐवढेच नाही, Firefox च्या इतर घटकांप्रमाणेच, याचा वापर देखिल open मानक द्वारे, वेब डेव्हलपरच्या सुविधा नुरूप केला आहे.

हे कसे काम करते?

ठिकाणाची-जाणीव सक्षम सेकंतस्थळावर भेट दिल्यास, Firefox तुम्हाला ठिकाणाची माहिती सहभागीय करण्यासाठी खात्री करतो.

तुमची परवानगी असल्यास, Firefox जवळच्या वायरलेस ऍक्सेस् पॉईन्ट व संगणक वरील IP पत्याची माहिती प्राप्त करतो. त्यानंतर Firefox ही माहिती मुलभूत geolocation सेवा पुरवठाकर्ता, Google Location Services, कडे पाठवितो व तुमच्या ठिकाणाची अंदाजे माहिती प्राप्त करतो. प्राप्य अंदाजे माहिती त्यानंतर विनंतीकृत संकेतस्थळाशी सहभागीय केली जाते.

तुमची परवानगी नसल्यास, Firefox काहिच लागू करत नाही.

ठिकाणाची माहिती किती अचूक असते?

अचूकपणा वेगळे ठिकाण नुरूप बदलू शकते. काहिक ठिकाणी, आमचे सेवा पुरवठाकर्ता काहिक मिटर अंतर्गतच आढळणाऱ्या ठिकाणांची माहिती पुरवू शकतात. तर, काहिक ठिकाण त्यापेक्षा जास्त अंतरावर आढळू शकतात. आमच्या सेवा पुरवठाकर्ता द्वारे पुरवलेले सर्व ठिकाण फक्त अंदाजे असल्यामुळे आम्ही ठिकाणांच्या माहितीयी खात्री देत नाही. कृपया ही माहिती तातडीने आवश्यक घटनांकरीता लागू करू नका. नेहमी आपल्या बुद्धीचा वापर करा.

कोणती माहिती पाठवली जाते, व कुणाला पाठली जाते? माझी गोपणीयता कशी सुरक्षीत राहते?

तुमची गोपणीयता आम्हाला खूप महत्वाची आहे, व Firefox ठिकाण विषयक माहिती तुमच्या परवानगी विना कधिच सहभागीय करत नाही. आपली माहिती प्राप्त करण्याकरीता पानावर भेट देतेवेळी, विनंतीकृत संकेतस्थळाशी माहिती सहभागीय करण्यापूर्वी तुम्हाला व तसेच आमच्या तिसरे-पक्षीय सेवा पुरवठाकर्ता यांस विचारले जाते.

मुलभूतरित्या, Firefox तुमच्या ठिकाणाची माहिती Google Location Services चा वापर करून, खालिल पाठवून करतो:

 • तुमच्या संगणकाचा IP पत्ता,
 • जवळच्या वायरलेस ऍक्सेस् पॉईन्टची माहिती, व
 • Google द्वारे लागू केलेले, कुठलाही क्लाऐंट ओळखकर्ता, ज्याची प्रत्येक 2 सप्ताह अशी वेळ समाप्ती असते.

Firefox द्वारे गोळा केलेल्या व वापरलेल्या संपर्णू माहिती करीता, कृपया Firefox गोपणीयता करार (अंग्रेजीतून) पहा.

त्यानंतर Google Location Services तुमचे अंदाजे geolocation (उ.दा., अक्षांश व रेखांश) पाठवतो. Google द्वारे गोळा केलेल्या संपूर्ण माहिती करीता, कृपया Google Geolocation गोपणीयता करार (अंग्रेजीतून) येथे भेट द्या.

तुमची गोपणीयता सुरक्षीत ठेवण्याकरीता माहिती एका एनक्रिप्टेड जुळवणीवर पाठवली जाते. Firefox कडे तुमच्या ठिकाण विषयी माहिती प्राप्त झाल्यावर, त्यांस विनंतीकृत संकेतस्थळाकडे पाठवले जाते. तुम्ही भेट दिलेल्या संकेतस्थळाचे नाव किंवा ठिकाण, किंवा कुठल्याही कुकीज, कधिही Google Location Services शी सहभागीय केली जात नाही.

Google Location Services द्वारे गोळा केलेली माहिती कधिही Mozilla किंवा Google तर्फे तुमची ओळख पटवण्याकरीता किंवा गुप्तहेर करीता वापरली जात नाही.

विनंतीकृत संकेतस्थळ या माहितीचे काय करते, व त्यासंबंधित अधिक माहिती करीता, कृपया संकेतस्थळाचे गोपणीय करार पहा.

गोपणीयता विषयी अधिक माहिती करीता, तुम्ही खालिल देखिल पहा:

वेब वर तपासणी करतेवेळी मला कुणी हुडकवतो का?

नाही. Firefox, ठिकाण विषयी विनंती तेव्हाच करतो जेव्हा संकेतस्थळ विनंती पाठवतो, व वापरकर्ता द्वारे विनंती मान्य केल्यावरच माहिती सहभागीय केली जाते. तपासणी करतेवेळी Firefox तुमचे ठिकाण हुडकवत नाही किंवा लक्षात ठेवत नाही.

संकेतस्थळ करीता लागू केलेली परवानगी नाहीशी कशी करायची?

Firefox परवानगी, ठिकाण विषयक माहिती नेहमी स्थळाकडे पाठवायची, अशी निश्चित केले असल्यास व पुढे ती टाळल्यास, परवानगी त्यांस सहजपणे रद्द केली जाऊ शकते. हे खालिलरित्या शक्य आहे:

 • परवानगीय संकेतस्थळाकडे जा
 • साधन मेन्यूकडे जा, त्यानंतर पानाची माहिती येथे जा
 • परवानगी टॅब नीवडा
 • ठिकाण सहभागीय करा करीता संयोजना बदला

ठिकाणाची-जाणीव सक्षम तपासणी नेहमीकरीता कशी बंद करायची?

Firefox मध्ये ठिकाणाची-जाणीव सक्षम तपासणी नेहमी समाविष्टीत आहे. कुठल्याही ठिकाण विषयक माहिती तुमच्या परवानगी विना पाठवली जात नाही. गुणविशेष पूर्णपणे अकार्यान्वीत करायचे असल्यास, कृपया खालिल करा:

 • URL पट्टीत, about:config टाइप करा
 • geo.enabled टाइप करा
 • geo.enabled आवड-नीवड वर दोनवेळा क्लिक करा
 • ठिकाणाची-जाणीव सक्षम तपासणी आता अकार्यान्वीत झाली आहे

माझ्या संकेतस्थळास मी जिओलोकेशनचा आधार कसा देऊ शकतो?

Mozilla Developer Center येथील सुचनांना अनुसरुन आपण जिओलोकेशनचा आधार आपल्या सेवेत आंतर्भूत करु शकता.