Firefox: एक ध्येयवादी बंडखोर

Firefox स्वतंत्र आहे आणि Mozilla विना-नफा संस्थेचा एक घटक आहे, जी आपल्या ऑनलाईन हक्कासाठी लढते, कॉर्पोरेट ताकतीला आळा घालते आणि इंटरनेट सर्वांसाठी आणि सर्वत्र वापरण्यायोग्य बनवते.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox गोपनीयता

कोणतेही बंधन नाही

Firefox विना-नफा तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ, आम्ही अशा गोष्टी करू शकतो ज्या दुसरे करू शकत नाहीत, जसे काहीही छुपा अजेंडा नसलेली नवीन उत्पादने आणि वैशिष्ट्ये निर्मित करणे. आम्ही मागोवा संरक्षणासहित खाजगी ब्राउझिंग सारख्या साधनांद्वारे आपल्या गोपनीयतेच्या अधिकारांचे समर्थन करतो, जे Google Chrome आणि Microsoft Edge करत नाहीत.

जे तुम्ही बघता तेच तुम्हाला मिळते

आमचा असा विश्वास आहे की इंटरनेट हे लोकांसाठी आहे, नफ्यासाठी नाही. अन्य कंपन्यांप्रमाणे, आम्ही आपल्या डेटावरील प्रवेशाची विक्री करत नाही. आपले शोध आणि ब्राउझिंग इतिहास कोण पहातात यावर पूर्णतः आपले नियंत्रण आहे. निवड — ह्यामुळेच इंटरनेट स्वस्थ आहे!

एक ध्येयवादी ब्राउझर

आपल्या ऑनलाइन अधिकारांसाठी लढण्याबरोबरच, स्वस्थ इंटरनेट पद्धतींचा प्रचार करण्यासाठी जगभरातील सहकार्यांसह कार्य करत असतानाच आम्ही कॉर्पोरेट शक्तींना तपासणीत ठेवतो. म्हणूनच जेव्हा आपण Firefox ला निवडता तेव्हा आम्हीदेखील तुम्हाला निवडतो.